रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे
भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५
जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत.
राजेंद्र प्रसाद
डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत
देशाचे पहिले
राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार
भागामधील प्रमुख
नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य
मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.
प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी (बांग्ला:
প্রণব
মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी:
Pranab Mukherjee) (११ डिसेंबर,
इ.स. १९३५
- हयात) हे भारतीय
प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती
आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९
पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट
मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी
काँग्रेस
पक्षामधून राजीनामा दिला.
No comments:
Post a Comment