(1) नागपंचमी
प्रस्तावना
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार
जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे
म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या
नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक
श्रद्धाळू माणसे नागदेवतेची
पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना
करतात.
अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)
भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची
पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प.
याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते . नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी
त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले. [१]
नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते..
दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी
नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे . [२]पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.
--आधुनिक काळत नागपंचमीवे व्रत कसे करावे?==
- आजचे नागपंचमीचे व्रत नागप्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून करता येईल.
- दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे
- नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच * नागपंचमीचे आधुनिक व्रत 'धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा ' अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना केवढा आनंद होतो ! मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा.[३]
स्त्रिया व सण
नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग
म्हणून आलेली दिसते.
लोकगीत
नागभाऊरायाला नैवेद्य :
नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी
साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा[४]
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा[४]
चल गं सये वारुळाला ,नागोबाला पूजायाला | ताज्या लाह्या वेचायाला हळदकुंकू व्हायला
या गं य गडयीनी या गं या मैतरणी तेल्या
तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई
भावगीत
- फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे, पंचमिचा सण आला डोळे माझे ओले (कवी - ग.दि. माडगूळकर; गायक - गजानन वाटवे)
चित्रपटगीत
चल गं सये वारुळाला वारुळाला,नागोबाला पुजायाला
पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर;
संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके;
चित्रपट - जिवाचा सखा)
(2) पोळा
पोळा म्हणजेच बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपद अमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येतो.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते
मातीच्या बैलाची पूजा करतात. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी
झालेला असतो; शेतात पीक/धान्य कापणीला
आलेले असते; सगळीकडे हिरवळ असते; श्रावणातले सण संपत आलेले असतात; एकूण आनंदाचे वातावरण असते.
या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (की पराणी?) (जिच्या टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो अशी बैलांना
हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण
(आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारून
घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली
असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. त्यांच्या पाठीवर
नक्षीकाम केलेली झूल
(पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे
ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा शृंगार -?) गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा
(आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणा्र्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.या सणासाठी शेतकर्यांमध्ये
उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा
साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर
(आखरावर) एक आंब्याच्या पानाचे मोठे तोरण
करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व
बैलजोड्या, वाजंत्री,
सनया, ढोल, ताशे
वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर,
'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण
तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल
नेणार्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.
(3) गणेशोत्सव
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर
टिळकांनी ह्या उत्सवाला
सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते.
हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता
गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.
गणपतीची जन्मकथा
एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच
राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची
मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्याने त्यांना रोखले.
भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्याचे शिरच उडवले.
पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर
पहारेकर्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा
शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो
घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा
पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती)
आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात
मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक
कार्यक्रम केले जातात. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य
टिळकांनी केली. गणेशाच्या
अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.[१] गणेश चतुर्थी व्रत- गाणपत्य संप्रदायाचे हे एक महत्वाचे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या असे महिनाभर
करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जावून, स्नान करून मातीची आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून ती लगेच नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश
व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव
मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला
महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा शिवा असेही म्हणतात. गणपती ही संघटनेची देवता
आहे.ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा
अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होवून पुराणकाळात तिला
गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते.[२]
प्रतिष्ठापना पूजा
श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र ,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या
प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून
घेणे आवश्यक आहे.उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या
विकारांवर शमीच्या पाल्याचा रस , जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात.धोत-याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या
पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन
करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी
म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम
।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या
सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता
प्रस्थान करावे.’ श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि
श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.
घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना
समर्थ रामदास आणि गणेश
सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी
चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी
देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद
शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी
श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.
समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !! सकळ प्रांन्तासी
मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !! समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण
करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद
संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक
विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या
समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता
त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना
केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात
अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो. वार्ता विघ्नाची नुरवी
पुरवी प्रेम कृपा जयाची ! हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे
श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास
स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर
भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव
रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद
पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत
जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत
पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत.
ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया
उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो . समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे
समर्थे माझी परीक्षा मांडली !! आकारा आकरी खंडी
कोठी पाठविली ! हनुमान स्वामी
मुष्ठी लक्षुनिया!! ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे
आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ
रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या
आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या
स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून
शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा..... दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !! शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची
शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना
दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ
शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण
झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ
रामदास स्वामी यांनी सुरू केला.
लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव
इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना
वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुनकरण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांचे अंधानुकरण करणार्या
भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती.
ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?" [१८] त्यांच्या मते भारतीयांच्या
दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा
आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी
जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले.
हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण
टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप
दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने
ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे
म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा.
१८९३च्या मुंबई आणि पुण्यातील
हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना
एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते.
अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला.
थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. गणेश चतुर्थी ला सुरू झालेला गणेशोत्सव हा
दहा दिवसांचा सोहळा असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व
काळात जन जागृती, लोक संघटन, लोक संग्रह या कारणासाठी होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे स्वरूप बदलले आहे. लोकमान्य टिळक
यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक
उत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरातून.
स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. टिळक यांनी दैनिक केसरीमध्ये पहिल्या गणेशोत्सवानंतर
लिहिलेल्या अग्रलेखात त्या काळच्या
वातावरणाचा उल्लेख केला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन
गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीतील उत्साही तरुणांनी १८९२ साली मुंबईतील
पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. लोकमान्यांना अभिप्रेत
असलेला उत्सव व समाजप्रबोधनाचे कार्य तिथे होऊ लागले. केशव नाईकांच्या
चाळींचा आदर्श ठेवून मुंबईतील त्या
काळातील अनेक चाळींनी, वाडय़ांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली.देवघरातील गणपती सार्वजनिक गणेशोत्सव स्वरुपात घराबाहेर आणला हे एक क्रांतिकारी पाऊल होते असे तज्ञांचे मत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक प्रकारे
साजरा केला जातो.
- व्याख्यानमाला आयोजित करून तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळवून देणे
- पौराणिक देखावे बनवून जनतेला संदेश देणे
- जीवंत देखावे दाखवून जनतेला संदेश देणे
- विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून जनतेचे मनोरंजन करणे
- समाज विधायक कामे करणे
अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना
यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी
धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना
विश्वास वाटला, अशा शिवाजी
महाराजांच्या स्वरूपात त्यांना एक आदर्श व्यक्ती दिसली. याचा फायदा करून घेऊन टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीजयंतीची सुरुवात तर केलीच, शिवाय भारतभर दौरे
करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशभरात, विशेषतः बंगालमध्ये
शिवाजीजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.परंतु
आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्य लक्ष्यात येते.
पुण्यातील गणेश विसर्जन उत्सवाचा इतिहास
एकेकाळी गणपती विसर्जन मिरवणूक
पाहण्यासाठी पुण्यात लोकांची गर्दी होत असे. आजही विसर्जन
मिरवणुकीचा उत्साह कमी झालेला नाही. सन १८९३ पासून पुण्यातील सर्व गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. पुण्यातील या गणपती विसर्जन मिरवणुकांचा इतिहास मंदार लवाटे यांनी ‘पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१
वर्षांचा’ हा पुस्तकात दिला आहे. विसर्जन मिरवणुकीसंबंधीची दुर्मीळ छायाचित्रेरं आणि मिरवणुकीसंदर्भात घडलेल्या विविध घटनांची माहिती पुस्तकात आहे. पुण्याखेरीज
महाराष्ट्रातही तसेच मुंबईइ.शहरातही
गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
(4) हरितालिका
हरितालिका हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली
म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात.हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी.[१]
कथा,आख्यायिका
पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु
पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने
तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या
सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने
शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत
उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.
व्र्तामागील आशय
शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे
म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन
आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची.[२]
पूजाविधी
वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित
आहे.संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन
असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे
वर्णन आढळते.[३]दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर
महिला आपला उपवास सोडतात.[४]
प्रांतानुसार
पार्वतीसारखाच आपल्यालाली चांगला नवरा
मिळावा म्हणून दक्षिणी भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद
शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये
हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव
चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात.महाराष्ट्रामध्ये
अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात.
श्रावण शुद्ध तृतीयेला सुवर्णगौरी (मधुश्रावणिका), श्रावण कृष्ण तृतीयेला कज्जली गौरी आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका ही व्रते करून सौभाग्यवती स्त्रियांनी तीनदा गौरी पूजा करावी असे शास्त्र सांगते.संदर्भ
हवा
(5) गौरीपूजन
व्रताचे स्वरूप
गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे.यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात
अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे
महालक्ष्मी/गौरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.
तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी
म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा
गौरी म्हणतात.
आख्यायिका आणि इतिहास
हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये
गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे
सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी
एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी
गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले
सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपा
प्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त
झाले,म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.[१]
आशय व महत्व
महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडतात. शेती हा प्रमुख व्यवसाय
असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी
वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा,भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.[२]
गौरी नावाचे अर्थ
वा.शि. आपटे यांच्या संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची,अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत..[३]
गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
गौरी ही गोधासना(???) असावी. तिला चार हात, तीन डोळे असावेत आणि ती आभूषणांनी युक्त असावी, असे म्हटले आहे. स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. कोणाकडे गौरींचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार
पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा
करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात
पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर
मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन
त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर
मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट
आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी
संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या
हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी
उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात.कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. [४]
गौरी आवाहन (दिवस पहिला)
आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय
दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात.
त्यावेळी ताट चमच्याने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना
करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा
बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी
नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.
गौरीपूजन (दिवस दुसरा)
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा
(रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी शास्त्रानुसार मोठी पूजा, व आरती करतात. त्या दिवशी पूजेला शेवंतीच्या फुलांचे खूप महत्त्व आहे. शेवंतीच्या फुलांचा हार गौरीच्या गळ्यात घालतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र
भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली
ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. दिवेफळ ठेवतात त्यात तुपातील वाती लावतात. संध्याकाळी बायकांचा हळदीकुंकुवाचा कार्यक्रम
ठेवलेला असतो. त्या निमित्ताने
सर्वांच्या घरातील महालक्ष्मींचे दर्शन होते. अशा प्रकारे ह्या दिवशीची पूजा पार पाडली जाते. ह्या दिवशी
गौरींच्या/महालक्ष्मींच्या चेहर्यांवर एक
वेगळाच आनंद पाहायला मिळतो, असे बायकांना वाटते. जरी ते मुखवटे मातीचे,शाडूचे किंवा पितळेचे असले तरी त्यांच्या चेहर्यांवरील आनंद, त्यांच्या
डोळ्यांत दिसणारी चमक काही औरच असते अशी श्रध्दा आहे.
विसर्जन (दिवस तिसरा)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पाच(?) सवाष्णींना किंवा घरच्याच लोकांना जमवून पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात, त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात.
यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या
वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा
भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी
गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. कारण या माहेरवाशिणी या दिवशी आपल्या माहेरून सासरी जात असतात असे मानले जाते. गौरींना निरोप देण्याची वेळ
जसजशी जवळ येते तशी घरातील मंडळींची
हुरहूर वाढत जाते.रात्री पंचांग वेळ पाहून गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप
घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. (धातूच्या किंवा कायम
स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे
विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून
संरक्षण होते अशी समजूत आहे.[५]
दोरकाची पूजा
या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो
गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या
गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक
येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.[६]
प्रांतानुसार
दक्षिणी भारतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला
मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.[७]
लोकसाहित्यातील उल्लेख
लोकसाहित्यात गौरीपूजन प्रसंगी म्हटली
जाणारी गीते आहेत -
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. -- भूमी आणि स्त्री (शैला लोहिया, गोदावरी प्रकाशन)
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. -- भूमी आणि स्त्री (शैला लोहिया, गोदावरी प्रकाशन)
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली -- भूमी आणि स्त्री (शैला लोहिया, गोदावरी प्रकाशन)
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली -- भूमी आणि स्त्री (शैला लोहिया, गोदावरी प्रकाशन)
ललित साहित्यातील आणि दृक्श्राव्यमाध्यमातील उल्लेख
- गवराय आली गवराय आली
कोणत्या पावलानं ?
हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या
हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या
- रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - राम कदम; गायिका - उ़षा मंगेशकर; चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा)
·
- गौरीला घागरी फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही 'घागर घुमू दे' अशा शब्दांनी होते. अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात. अशीच एक माहेरवाशीण हे गाणे गाते आहे. ती म्हणते,'पाखरा माझ्या माहेरी जा. तिथे माझी गवराबाई आली असेल तिचे स्वागत कर.'
- रुणझुणत्या पाखरा, तू जा माझ्या माहेरा (कवी - ग.दि. माडगुळकर, संगीत - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)
(6) नवरात्र
हिंदु धर्मात
भगवती
देवीची विशेष आराधना वर्षातून
दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र
शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध
नवमीपर्यंत व शारदीय
नवरात्रात आश्विन शुद्ध
नवमीपर्यंत देवीची उपासना
केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. याशिवाय आषाढ आणि माघ महिन्यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या नऊ रात्रींना ’गुप्त नवरात्र’ म्हणतात.
वैशाख शुद्ध षष्ठीपासून नृसिंह नवरात्र
सुरू होते. ते नवव्या दिवशी, नृसिंह जयंतीला
(वैशाख शुद्ध चतुर्दशीला) संपते.
चंपाषष्ठीचे
नवरात्र सहा दिवसांचे असते. ते
मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदीपावलीच्या
दिवशी सुरू होते आणि चंपाषष्ठीला
संपते.
शारदीय नवरात्रोत्सव
हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना
करण्याचा आहे.
पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना
होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात
संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
घटामध्ये
नंदादीप
प्रज्वलित करून ब्रह्मांडातील
आदिशक्ति-आदिमायेची
मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित
अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्या
नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.
नवरात्रातील नऊ माळा
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक
दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
पहिली माळ
दुसरी माळ
तिसरी माळ
चौथी माळ
पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात..
सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ
नववी माळ
कुंकुमार्चनाची वाहतात.
शारदीय नवरात्रातील नऊ रंग
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणार्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे. देवीला त्या त्या दिवशी त्या
विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.
महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. गावांगावांतील बँका किंवा तत्सम स्त्रीबहुल कार्यालयांमध्ये नवरात्रात असे
एकरंगी दृश्य असते. या प्रथेची सुरुवात २००४ सालापासून झाली, ती अशी:-.
२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणार्या
साड्यांचे रंग 'महाराष्ट्र
टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईभरातल्या महिलांनी नऊ दिवस त्या त्या
रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे
दरवर्षी घडत गेले. आता नवरात्रीत वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या ’आजच्या रंगाने’ मुंबई रंगून जाऊ लागली.. लोकल ट्रेन्स, सरकारी बिन-सरकारी ऑफिसे, महिलामंडळे एवढेच काय पण हॉस्पिटल्सही या रंगांच्या साड्यांनी रंगून जातात. आता मुंबईच नाही तर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव अशा अनेक गावांत नवरात्रीच्या नऊ दिवसांत रंगांची ही उधळण
पहायला मिळते.
ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची
कल्पना महाराष्ट्र
टाइम्सने बहुसंख्य सामान्य
आणि तमाम नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची मूळ कल्पना एकोणीसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही [१] अस्तित्वात होती. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस
उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी
हे रंग राखून ठेवले आहेत.{याचा संदर्भ कृपया नोंदवावा.}
इसवी सन २०१४ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
पहिला दिवस (२५ सप्टेंबर, गुरुवार) - प्रतिपदा : पिवळा
दुसरा दिवस (२६ सप्टेंबर, शुक्रवार) - द्वितीया - हिरवा
तिसरा दिवस (२७ सप्टेंबर, शनिवार) - तृतीया - करडा (ग्रे)
चौथा दिवस (२८ सप्टेंबर, रविवार) - चतुर्थी - केशरी
पाचवा दिवस (२९ सप्टेंबर, सोमवार) - पंचमी - पांढरा
सहावा दिवस (३० सप्टेंबर, मंगळवार) - षष्ठी - लाल
सातवा दिवस (१ ऑक्टोबर, बुधवार) - सप्तमी - निळा
आठवा दिवस (२ ऑक्टोबर, गुरुवार) - अष्टमी - गुलाबी
नववा दिवस (३ ऑक्टोबर, शुक्रवार) - नवमी - जांभळा
दुसरा दिवस (२६ सप्टेंबर, शुक्रवार) - द्वितीया - हिरवा
तिसरा दिवस (२७ सप्टेंबर, शनिवार) - तृतीया - करडा (ग्रे)
चौथा दिवस (२८ सप्टेंबर, रविवार) - चतुर्थी - केशरी
पाचवा दिवस (२९ सप्टेंबर, सोमवार) - पंचमी - पांढरा
सहावा दिवस (३० सप्टेंबर, मंगळवार) - षष्ठी - लाल
सातवा दिवस (१ ऑक्टोबर, बुधवार) - सप्तमी - निळा
आठवा दिवस (२ ऑक्टोबर, गुरुवार) - अष्टमी - गुलाबी
नववा दिवस (३ ऑक्टोबर, शुक्रवार) - नवमी - जांभळा
इसवी सन २०१५ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
पहिला दिवस (१३ ऑक्टोबर, मंगळवार) - प्रतिपदा : लाल
दुसरा दिवस (१४ ऑक्टोबर, बुधवार) - द्वितीया - निळा
तिसरा दिवस (१५ ऑक्टोबर, गुरुवार) - तृतीया - पिवळा
चौथा दिवस (१६ ऑक्टोबर, शुक्रवार) - चतुर्थी - हिरवा
पाचवा दिवस (१७ ऑक्टोबर, शनिवार) - पंचमी - करडा (ग्रे)
सहावा दिवस (१८ ऑक्टोबर, रविवार) - षष्ठी - केशरी
सातवा दिवस (१९ ऑक्टोबर, सोमवार) - सप्तमी - पांढरा
आठवा दिवस (२० ऑक्टोबर, मंगळवार) - अष्टमी - गुलाबी
नववा दिवस (२१ ऑक्टोबर, बुधवार) - नवमी - जांभळा
दुसरा दिवस (१४ ऑक्टोबर, बुधवार) - द्वितीया - निळा
तिसरा दिवस (१५ ऑक्टोबर, गुरुवार) - तृतीया - पिवळा
चौथा दिवस (१६ ऑक्टोबर, शुक्रवार) - चतुर्थी - हिरवा
पाचवा दिवस (१७ ऑक्टोबर, शनिवार) - पंचमी - करडा (ग्रे)
सहावा दिवस (१८ ऑक्टोबर, रविवार) - षष्ठी - केशरी
सातवा दिवस (१९ ऑक्टोबर, सोमवार) - सप्तमी - पांढरा
आठवा दिवस (२० ऑक्टोबर, मंगळवार) - अष्टमी - गुलाबी
नववा दिवस (२१ ऑक्टोबर, बुधवार) - नवमी - जांभळा
२०१६ साली प्रतिपदा लागोपाठ दोन दिवस
असल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे. (यापूर्वी २०१२ साली ते आठ दिवसांचे होते!.)
इसवी सन २०१६ सालच्या नवरात्रीतील दैनिक रंग
दिवस पहिला – १ ऑक्टोबर, शनिवार, प्रतिपदा - राखाडी (ग्रे)
दिवस दुसरा – २ ऑक्टोबर, रविवार, प्रतिपदा - भगवा (ऑरेंज)
दिवस तिसरा – ३ ऑक्टोबर, सोमवार, द्वितीया - सफेद (व्हाईट)
दिवस चौथा – ४ ऑक्टोबर, मंगळवार, तृतीया, - लाल (रेड)
दिवस पाचवा – ५ ऑक्टोबर, बुधवार, चतुर्थी - निळा (रॉयल ब्लू)
दिवस सहावा – ६ ऑक्टोबर, गुरुवार, पंचमी - पिवळा (यलो)
दिवस सातवा – ७ ऑक्टोबर, शुक्रवार, षष्ठी - हिरवा (ग्रीन)
दिवस आठवा – ८ ऑक्टोबर, शनिवार, सप्तमी- मोरपंखी (पिकॉक ग्रीन)
दिवस नववा – ९ ऑक्टोबर, रविवार, अष्टमी - जांभळा (पर्पल)
दिवस दहावा – १० ऑक्टोबर, सोमवार, नवमी - आकाशी (Sky Blue)
दिवस अकरावा (दसरा) - ११ ऑक्टोबर, मंगळवार - गुलाबी (Pink)
दिवस दुसरा – २ ऑक्टोबर, रविवार, प्रतिपदा - भगवा (ऑरेंज)
दिवस तिसरा – ३ ऑक्टोबर, सोमवार, द्वितीया - सफेद (व्हाईट)
दिवस चौथा – ४ ऑक्टोबर, मंगळवार, तृतीया, - लाल (रेड)
दिवस पाचवा – ५ ऑक्टोबर, बुधवार, चतुर्थी - निळा (रॉयल ब्लू)
दिवस सहावा – ६ ऑक्टोबर, गुरुवार, पंचमी - पिवळा (यलो)
दिवस सातवा – ७ ऑक्टोबर, शुक्रवार, षष्ठी - हिरवा (ग्रीन)
दिवस आठवा – ८ ऑक्टोबर, शनिवार, सप्तमी- मोरपंखी (पिकॉक ग्रीन)
दिवस नववा – ९ ऑक्टोबर, रविवार, अष्टमी - जांभळा (पर्पल)
दिवस दहावा – १० ऑक्टोबर, सोमवार, नवमी - आकाशी (Sky Blue)
दिवस अकरावा (दसरा) - ११ ऑक्टोबर, मंगळवार - गुलाबी (Pink)
पेशव्यांचा नवरात्रोत्सव
पेशव्यांच्या काळातील नवरात्र हे शाही
पद्धतीने साजरे केले जायचे.
प्रतिपदा
या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते
अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय ’देवीचा उदो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाके.
द्वितीया
रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी
मळवट भरून उदो करीत.
तृतीया
अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत
असे.
चतुर्थी
सरकारवाड्यातीलव बाहेरील नागरिक निराहार
उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्राथना करीत.
पंचमी
श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे
जागरण करीत.
षष्ठी
दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा
पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.
सप्तमी
सप्तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची
पूजा बांधत असत.
अष्टमी
देवीपूजनाचे वेळी ’अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली’ असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना
करीत.
नवमी
होमहवन,
जपजाप्य,
षोडश पक्वान्नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची
बोळवण.
दशमी
अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर
शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.
देवीची नऊ रूपे
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम्
।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः
प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८.
महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
माहात्म्य
नवरात्रीतील नऊ दिवसांच्या काळात दुर्गादेवी तेजतत्त्वाच्या आधारे आपल्या नऊ प्रमुख शस्त्रांसहित
ब्रह्मांडात विहार करते, असा समज आहे. आदिशक्तीचे
हे दरदिवशी नव्या रूपासहित भ्रमण करणे, म्हणजेच दरदिवशी चढत्या क्रमाने सप्तपाताळांतून पृथ्वीवर येणार्या त्रासदायक लहरींचे समूळ उच्चाटन करणे, अशी समजूत आहे. हे नऊ दिवस ब्रह्मांडात वाईट शक्तींनी
प्रक्षेपित केलेल्या त्रासदायक लहरी, तसेच आदिशक्तीच्या मारक व चैतन्यमय लहरींचे युद्ध चालू असते. या वेळी ब्रह्मांडातील वातावरण तप्त झालेले असते व
दुर्गादेवीच्या शस्त्रांतून तेजाची झळाळी अतिवेगाने सूक्ष्म शक्तींवर हल्ला
करत असते, अशी कल्पना आहे.
याचे प्रतीक म्हणून घट
व त्यातील नंदादीप यांना प्रतीकात्मक
रूपात पूजले जाते. घटात
दीपाच्या उष्णतेमुळे निर्माण झालेले
वातावरण हे ब्रह्मांडात नऊ दिवस अहोरात्र सुरू
असलेल्या युद्धातून निर्माण झालेल्या तप्त वायुमंडलाशी साधर्म्य दर्शवते, तर दीप
हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून
निर्माण होणाऱ्या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात
घटपूजन केल्याने वास्तूमध्येही दुर्गादेवीचे मारक चैतन्य कार्यरत होऊन वास्तूमधील त्रासदायक लहरींचे निर्दालन करते, अशी या मागची धार्मिक श्रद्धा
आहे. मार्कंडेय
पुराणातील देवी माहात्म्यात
सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते, अशी मान्यता आहे. (८९.११.१२)
महाराष्ट्रातील नवरात्र
पूजाविधी
पूजा सामग्री :-
हळद, कुंकू, शेंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपार्या, खोबर्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळशी, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापसाची वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ). देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले कलश (घटस्थापनेसाठी ), शंख, घंटा, निरांजन, समई, वाती, कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तूप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.
हळद, कुंकू, शेंदूर, काजळ, गंध, आंब्याची पाच पाने, आंब्याच्या पाच पानांचा टहाळा, कापूर, धूप, उदबत्ती, कुंकुममिश्रित अक्षता, विड्याची पाने, सुपार्या, खोबर्याची वाटी, गूळ, ५ नारळ, ५ खारका, ५ बदाम, साखर, फुले, तांबडी फुले, झेंडूची फुले, गुलाब, तांबडे कमळ, दूर्वा, दूर्वाग्म ( दूर्वाची जुडी), शमी, बेल, तुळशी, पाच फळे, केळी, दूध, दही, तूप, साखर, मध हे पाच पदार्थ पंचामृतासाठी. दोन कापसाची वस्त्रे, चंदन ( सहाण व खोड ). देवीसाठी चोळी, मंगळसूत्र, हिरव्या बांगडया, पळी पंचपात्र, तीर्थासाठी भांडे, ३ पाट, २ पाण्याने भरलेले कलश (घटस्थापनेसाठी ), शंख, घंटा, निरांजन, समई, वाती, कापूरारती, धूपारती, उदबत्तीचे घर, नंदादीप, सुंगंधी द्रव्ये, सुटी नाणी, गोडतेल, तूप-वाती निरांजनासाठी, फुलांचा हार, घटस्थापना करण्यासाठी दोन पाण्याने भरलेले कलश, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, कलशात टाकण्यासाठी वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती, कलशात टाकण्यासाठी हळद, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी द्र्व्ये, कलशावर ठेवण्याकरिता पाच आंब्याची पाने, त्यावर नारळ, देवीला नैवेद्यासाठी नारळाचे चूर्ण, साखर, दूध आणि महानैवेद्य.
हवनासाठी :-
यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, पाच प्रकारची फळे, खारीक, बदाम, खोबरे, गूळ, २० सुपार्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गाईची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी.
यज्ञकुंडासाठी चार विटा, नवीन चार पाट, तांदूळ १ किलो, २ कलश पाण्याने भरलेले, त्यावर ठेवण्याकरिता दोन ताम्हने, पाच प्रकारची फळे, खारीक, बदाम, खोबरे, गूळ, २० सुपार्या, विडयाची पाने, फुले, आंब्याची पाने, गणपतीची मूर्ती, देवीची मूर्ती, गाईची मूर्ती व वस्त्रे. शिवाय लाकूड, तूप, लोणी, चंदनाची व आंब्याची वृक्षाची काष्ठे, भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे, दूर्वा, गोमूत्र, पंचगव्य, पांढरी मोहरी, रुप्याचे नाणे, कोहळा इत्यादी.
दारावर लावण्यासाठी झेंडूचे तोरण.
होमासाठी नैवेद्य. रुजवणासाठी लाल माती भरलेली एक
परडी, नऊ प्रकारची धान्ये. याप्रमाणे घटस्थापनेची पूजा व हवन विधी यासाठी साहित्य जमा करावे आणि प्रसन्न मनाने
पूजेला बसतात. देवी
आपले मनोरथ पूर्ण करील अशी पूजा करणार्याची
श्रद्धा असते.
देवी पूजा विधी :-
महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आहे. अनेक कुटुंबांची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते.
महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीची पूजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबांत आहे. अनेक कुटुंबांची दुर्गा ही कुलदेवता आहे. या पूजाविधीत कुलाचारांना प्राधान्य असते.
नवरात्र हे एक धार्मिक व्रतही आहे. अनेक
हिंदू कुटुंबे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून
नवमीपर्यंत हे व्रत प्रतिवर्षी करतात. नवरात्र म्हणजे एक राष्ट्रीय उत्सवही आहे. काही स्त्रिया नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करतात. हा उपवास करणार्यांत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू गृहिणींचे
प्रमाण अधिक आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेस घरात अत्यंत
शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करतात. एका
तांब्याच्या कलशावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता महाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती यांची व त्याच्या अनेक परिवार देवतांची स्थापना करतात. दुसरा एक तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून
त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व
सुपारी ठेवतात. कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठे्वतात. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत लाल माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये पेरतात.. या
पेरलेल्या धान्यावर रोज पाणी
शिंपडतात. ते छोटेसे शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. याच हेतूने हे धान्य रुजत घालतात. या रुजवणाच्या एका बाजूला घंटा, दुसऱ्या बाजूला शंख इ मधोमध निरांजन प्रज्वलित करुन ठेवतात. देवीसमोर नंदादीप नऊ दिवस अखंड पेटत ठेवतात. दीपाच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे, देवीच्या शक्तीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे. कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडतात. घराच्या मुख्य दरवाजावर
झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्याची प्रथाही आहे. नवीन रेशमी वस्त्र नेसून
पूजेच्या वेळी पाटावर बसतात. तेलवात घातलेली समई प्रज्वलित करून स्वतःला
कुंकू लावून पूजेला आरंभ करतात.
संकल्प
-
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां
क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ
द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।
समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।
कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा
सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रादिवृद्धि - शत्रुपराजय -
कीर्तिलाभ - प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिद्ध्यर्थ - आद्यारंभ्य नवमीपर्यंत
महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थं मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं ॥
वगैरे मंत्र कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात.
मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां
क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिववृद्ध्यर्थ
द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ पुष्ट्यर्थ तुष्ट्यर्थ । समस्त मंगलावाप्त्यर्थ।
समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिद्ध्यर्थ ।
कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा
सर्वापच्छांतिपूर्वक दीर्घायुधर्नन - पुत्रादिवृद्धि - शत्रुपराजय -
कीर्तिलाभ - प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिद्ध्यर्थ - आद्यारंभ्य नवमीपर्यंत
महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थं मालाबंधनं अखंड दीपप्रज्वालनपूर्वकं ॥
वगैरे मंत्र कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारतात.
चंडिकास्तोत्र -
तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पूजन-उपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं
शारदानवरात्रपूजां करिष्ये ।
तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।
(असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडतात. पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवतात.)
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।
आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।
(असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)
तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पूजन-उपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरूपं
शारदानवरात्रपूजां करिष्ये ।
तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।
(असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडतात. पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवतात.)
तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थ (श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये ।
आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।
(असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडतात.)
श्रीमहागणपति पूजन -
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदूळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवून किंवा श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध, अक्षता, फु्ले इत्यादी वाहून पूजा करतात.
' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।
नमस्कार करून नंतर
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे ।
कवि कवीनामुपमश्रवस्तमम। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं ।
श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥ असे म्हणतात.
श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदूळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवून किंवा श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवून त्यावर गंध, अक्षता, फु्ले इत्यादी वाहून पूजा करतात.
' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।
नमस्कार करून नंतर
गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: । ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे ।
कवि कवीनामुपमश्रवस्तमम। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं ।
श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपतयै नम: आवाहनं समर्पयामि ॥ असे म्हणतात.
गणपतीवर अक्षता वाहून त्याला आसन - अर्ध्य इत्यादी उपचार अर्पण करतात.
नंतर दोन विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करतात. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर
नंतर दोन विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करतात. गणपतीची पूजा पूर्ण झाल्यावर
'कार्य मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि
नाशमायान्तु सर्वाणि सुरनाय ।'
अशी प्रार्थना करतात आणि 'श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडतात.
अशी प्रार्थना करतात आणि 'श्रीमहागणपतये नमो नम: ।' असे म्हणून हात जोडतात.
आसन व वातावरणशुद्धी :- ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं
च धारण मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥
अपक्रामन्तु भूतानि पिशाच्चा: सर्वतो दिशम् सर्वेवषाम विरोधेन पूजाकर्मं समारभे ॥२॥
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु
शिवाज्ञया ॥३॥
असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारही दिशांना फेकतात.
अपक्रामन्तु भूतानि पिशाच्चा: सर्वतो दिशम् सर्वेवषाम विरोधेन पूजाकर्मं समारभे ॥२॥
अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु
शिवाज्ञया ॥३॥
असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारही दिशांना फेकतात.
षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु:
कातिधाव्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का उरु
पादा उच्येते । हृदयाय नम:।
असे म्हणून हृदयाला हात लावतात.
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद वैश्य: पद्भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करतात.
ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत
। शिखायै वषट्।
असे म्हणून शेंडीला स्पर्श करतात.
पादा उच्येते । हृदयाय नम:।
असे म्हणून हृदयाला हात लावतात.
ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीत बाहू राजन्य: कृत: उरु तदस्य यद वैश्य: पद्भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।
असे म्हणून मस्तकाला स्पर्श करतात.
ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायत । मुखदिंदुश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत
। शिखायै वषट्।
असे म्हणून शेंडीला स्पर्श करतात.
ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीष्णौद्यौ:
समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा
लोकाँ अकल्पयन् । कवचाय हुं ।
असेम्हणून दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करतात.
लोकाँ अकल्पयन् । कवचाय हुं ।
असेम्हणून दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करतात.
ॐ सप्तास्यासन् परिधयस्त्रिसप्त समिध:
कृता:। देवा यज्ञज्ञं तन्वाना अबघ्नन्
पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट् । डोळ्यांना स्पर्श करावा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्
असे म्हणून टाळी वाजवतात व 'इति दिग्बंध:' असे म्हणतात.
पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट् । डोळ्यांना स्पर्श करावा ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्
असे म्हणून टाळी वाजवतात व 'इति दिग्बंध:' असे म्हणतात.
कलशपूजा - कलशस्य मुखे विष्णु: कंठे
रुद्र: समाश्रित: मूले तु स्थितो ब्रह्मा
मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:
। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥ श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥ शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी. शंखपुजा - शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥ शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥ गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी. घंटापूजा - आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम् ॥ घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी. दीपपूजा - भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करतात.
मध्ये मातृगणा: स्मृता: ॥
कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण:
। अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥ गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥ श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥ शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी. शंखपुजा - शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥ त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य नमोऽस्तुते ॥ शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥ गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी. घंटापूजा - आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुरु घंटाएवं तत्र देवताऽव्हानलक्षणम् ॥ घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी. दीपपूजा - भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥ दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ असे म्हणून समईला गंध, अक्षता, फूल वाहून नमस्कार करतात.
मंडप पूजा -
घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरे नीट सुशोभित अशी तयार करतात. या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात. श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ (मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहतात.)
घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरे नीट सुशोभित अशी तयार करतात. या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात. श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥ (मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहतात.)
प्रोक्षण
-
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडतात.)
अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥
(स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडतात.)
असे केल्यावर पूजाविधी संपूर्ण होतो.
आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसलि सिंहासनी
हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनी हो।।
मूलमंत्रजप करूनी भोंवते रक्षक ठेवूनी हो
ब्रह्मा विष्णू रुद्र आईचें पूजन करिती
हो ।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो
।।
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो
सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
।।
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळूनी
।।उदो।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो
पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळां हो ।।
कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो
अष्टभूजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला
हो ।।उदो।।
चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो
उपासकां पाहसी प्रसन्न अंतकरणी हो ।।
पूर्णकृपें जगन्माते मनमोहिनी हो
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी
हो ।।उदो।।
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो
अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो
।।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो
आनंदे प्रेम तें आले सद्भावे क्रीडतां हो
।।उदो।।
षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला
हो ।।
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
।।उदो।।
सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो
तेथे तूं नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो
।।
जाईजुईसेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडतां झेलुनि घेता वरचेवरी
।।उदो।।
अष्टमीचे दिवशी अष्टभूजा नारायणी हो
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो
।।
पहिलें शरण आलों तुजलागुनी हो
स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी ।।उदो।।
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणें हो
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो ।।
षड्सअन्ने नैवेद्यासी अर्पियेली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणां तृप्त केलें त्यां
कृपेकरूनी हो।।उदो।।
दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो
सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वां घेऊनी
हो ।।
शुभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणी
हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं
हो।।उदो।।
श्री देवी सूक्तम् आणि श्रीसूक्त
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्राये नियताः प्रणताः
स्मताम्।।
रौद्राये नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै
नमोनमः।
ज्योत्स्नाये चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं
नमः।।
कल्याण्ये प्रणतां वृद्धयै सिद्धयै
कुर्मो नमो नमः।
नैर्ऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै
ते नमो नमः।।
दुर्गाये दुर्गपारायै सारायै
सर्वकारिण्यै।
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं
नमः।।
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो
नमः।।
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति
शाब्दिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषू शान्तिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु स्मूतिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु तृष्टिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण
संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु
या।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो
नमः।।
चितिरूपेण या कृत्स्रमेतद्व्याप्य स्थिता
जगत।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा
सुरेन्द्रेण दिनेषु सेविता।
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि
भद्राण्यभिहन्तु चापदः।।
श्रीसूक्त****
हे देवी लक्ष्मीला आवाहन करणारे स्तोत्र
- सूक्त आहे. ऋग्वेदाच्या परिशिष्टात
खिलसूक्तात ते आले आहे. त्यात १५ ऋचा आहेत आणि १६वी ऋचा फलश्रुतीची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या सूक्ताने देवीला अभिषेक करण्याची पद्धत आहे.
हरि: ॐ हिरण्यवर्णां हरिणीं, सुवर्णरजतस्रजाम् (सुवर्णरजतस्स्रजाम्)।
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह ॥१॥
हे अग्ने, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांतीच्या, हरिणीप्रमाणे चपलगतीच्या, सोन्यारुप्याच्या
माला परिधान केलेल्या, चंद्राप्रमाणे आल्हाददायक अशा सुवर्णमयी लक्ष्मीला माझ्यासाठी आवाहन कर. ॥१॥
तां म आवह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरुषानहम् ॥२॥
हे अग्ने, जिच्यामुळे मला सुवर्ण, गोधन, अश्वधन, सेवकधन हे सारं प्राप्त होऊ शकेल अशा अविनाशी लक्ष्मीला
माझ्यासाठी आवाहन कर. ॥२॥
अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रबोधिनीम् (हस्तिनादप्प्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये, श्रीर्मा देवी जुषताम् ॥३॥
जिच्यासमोर अश्व आहेत, जी रथावर आरूढ आहे, हत्तींच्या गर्जनेने जी जाग आणते त्या
लक्ष्मीला मी आवाहन करतो, ती देवी लक्ष्मी माझ्यावर कृपा करो. ॥३॥
कां सोस्मितां हिरण्यप्राकाराम्, आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मे स्थितां पद्मवर्णां , तामिहोपह्वये श्रियम् ॥४॥
मुखावर स्मित आणि हृदयात ओलावा असलेली, तेजस्विनी, आत्मतृप्ता आणि भक्तांचं आर्त पुरविणारी, सुवर्णाने नटलेली, कमलवासिनी आणि कमलाच्या कांतीची जी लक्ष्मी, तिला मी आवाहन करतो. ॥४॥
चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं, श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये, अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ॥५॥
चंद्राच्या प्रभेसारखी उज्जवल, यशाने तळपणारी, देवसुद्धा जिची पूजा करतात अशा
लक्ष्मीला मी शरण आलो आहे. ती माझं दारिद्रय दूर करो अशी मी तिला प्रार्थना करतो. ॥५॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो, वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्व:।
तस्य फलानि तपसा नुदन्तु, मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी: ॥६॥
सूर्याप्रमाणे तेजस्वी कांती असलेल्या हे
लक्ष्मीदेवते, तुझ्या तपातून वनस्पतिविश्व आणि
त्यातही बिल्ववृक्ष उत्पन्न झाला आहे. तुझ्या तपातून उत्पन्न झालेल्या वृक्षांच्या फळांमुळे माझं अज्ञान, दु:ख आणि दारिद्रय दूर होवो. ॥६॥
उपैतु मां देवसख: , कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् , कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥७॥
देवमित्र कुबेर, कीर्तिदेवता आणि चिंतामणी यांसह देवी लक्ष्मी माझ्याकडे येवो. या राष्ट्रात- या भरतभूमीत माझा जन्म झाला याबद्दल
मला कृतार्थता वाटते. लक्ष्मीदेवी मला यश आणि समृद्धी देवो.॥७॥
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् , अलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिम् असमृद्धिं च, सर्वां निर्णुद मे गृहात् ॥८॥
भूक आणि तहानेने म्लान झालेल्या
दरिद्रतेला इथे थारा न उरो. हे लक्ष्मी, तू माझ्या घरातून दुर्भाग्य-दारिद्रय घालवून दे.॥८॥
गंधद्वारां (गंधद्द्वारां) दुराधर्षां, नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोपह्वये श्रियम् ॥९॥
रोमरोम सुगंधित असणारी, जिच्याशी सामना करणं दुरिताला कठीण आहे अशी, जिच्याभोवती समृद्धी-तृप्ती नांदते अशी, गजान्त वैभवाची स्वामिनी, सर्व भूतमात्रांतली ईश्वरी शक्ती जी लक्ष्मी तिला मी आवाहन करतो.॥९॥
मनस: काममाकूतिं, (मनसक्काममाकूतिं,) वाच: सत्यमशीमहि (वाचस्सत्यमशीमहि) ।
पशूनां रूपमन्नस्य, मयि श्री: श्रयतां (श्रीश्श्रयतां) यश:॥१०॥
हे लक्ष्मी, माझ्या मनातील कामना आणि संकल्प पूर्ण कर. माझी वाणी सत्य असावी. पशुधन, अन्न, श्रेष्ठ यश आणि उत्तम रूप यांची मला प्राप्ती व्हावी. ॥१०॥
कर्दमेन प्रजाभूता, (कर्दमेनप्प्रजाभूता,) मयि संभव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले, मातरं पद्ममालिनीम् ॥११॥
हे लक्ष्मीपुत्र कर्दमा, माझ्या ठिकाणी निर्माण हो. कर्दमामुळे पुत्रवती झालेल्या, कमळाचे हार
घालणाऱ्या तुझ्या आईचा म्हणजे लक्ष्मीचा माझ्या वंशात वास असावा. (कर्दम = निर्मितीची भूमी. बी रुजायला ओली जमीन (कर्दम) लागते.॥११॥
आप: सृजन्तु (आपस्सृजन्तु) स्निग्धानि, चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरम्, श्रियं वासय मे कुले ॥१२॥
हे लक्ष्मीपुत्र चिक्लीत, माझ्या घरात राहा. आमच्या घरात तुझा ओलावा असू दे. तुझ्या
आईचा - लक्ष्मीचा आमच्या वंशात वास असो. ॥१२॥
आर्द्रां य:करिणीं (यक्करिणीं) यष्टिं, सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आवह ॥१३॥
हे अग्ने, मृदू मनाची, सोन्याच्या रंगाची, कमळाच्या माळा घालणारी, सुवर्णाने अलंकृत अशी जी लक्ष्मी तिला माझ्यासाठी आवाहन
कर.॥१३॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं , पिंगलां पद्ममालिनीम् ।
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं , जातवेदो म आवह ॥१४॥
सोन्याप्रमाणे कांतिमान, सुवर्णमाला धारण करणारी, सूर्यासारखी तेजस्वी अशी जी लक्ष्मी, तिला, हे अग्ने, तुझ्याकरवी मी आवाहन करतो. ॥१४॥
यस्यां हिरण्यं प्रभूतं , गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम् ॥१५॥
हे अग्ने, जिच्या योगाने मला उदंड सुवर्ण, गोधन, अश्वधन, सेवकधन लाभणार आहे, त्या लक्ष्मीदेवतेला आवाहन कर. ॥१५॥
य: शुचि: प्रयतो भूत्वा, (यश्शुचिप्प्रयतो भूत्वा,) जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पंचदशर्चं च, श्रीकाम: सततं (श्रीकामस्सततं) जपेत् ॥१६॥
ॐ शान्ति: । शान्ति:। शान्ति: ॥
==संदर्भ आणि नोंदी ==
**** ज्ञान प्रबोधिनी प्रकाशित दीपावली लक्ष्मीपूजन सार्थ पोथी
भोंडला/हादगा
नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली
संध्याकाळी भोंडला खेळतात. पाटावर हत्तीचे चित्र
काढून त्याभोवती फेर धरण्याचा हा कार्यक्रम असतो. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात.
`गरबा खेळणे म्हणजे काय ?
`गरबा खेळणे यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तिरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी
कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास
आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते, अशी श्रद्धा आहे. टाळ्यांमुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी
भक्तियुक्त भजने म्हटल्याने
देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते, अशी समजूत आहे.. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यामध्ये छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे
लावले जातात आणि त्याभोवती
वर्तुळाकार नाचण्याची पद्धत आहे.
देवीची ओटी भरणे
अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असते, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते, असेसमजले जाते.
आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहातात.
इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करतात.
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करतात. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरतात. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.
उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करतात. व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
घागरी फुंकणे
नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे
मानले जाते. घागर फुंकरणार्या व्यक्तीच्या अंगात देवी संचारते असे
मानले जाते.
तांदुळाच्या पिठाचा मुखवटा
नवरात्रीतील अष्टमीला
तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिची पूजा करतात. चित्पावन कुटुंबातील एका प्रचलित प्रथेमुसार
नववधू विवाहानंतर पहिली पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराका(?)ची पूजा करते व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरते.
(7) विजयादशमी
आश्विन शुद्ध
दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून
पाळला जातो(?). देवीच्या
घटांची स्थापना आश्विन
शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र
साजरे होते जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात
येतो.
महाराष्ट्रात
दसऱ्याच्या दिवशी परस्परांना सोने म्हणून शमी व आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. सायंकाळी गावाची सीमा ईशान्येस ओलांडून जायचे, शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची
स्थापना करावयाची, तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर. त्यानंतर
योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्याानी
व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन
करायचे अशी प्रथा होती..[ संदर्भ
हवा ]
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव
होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत
असत. {१}
पौराणिक दाखले
- श्रीरामाने या दिवशी रावणाचा वध केला
- पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले
भारतातील विविध प्रांतांतील दसरा
उत्तर भारत
उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू
घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो.यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते.
महाराष्ट्र- महाराष्ट्रात कातकरी आदिवासी
स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.{२}
सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो.
रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये
दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला.
काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून
आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो
सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरूस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला.
तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक
कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा
व त्याही एकाकडूनच आणून दे. ही अट कौत्साने
मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही
एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत
गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दुःख झाले. रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान्
ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले.
कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण
ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे
कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी
ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा
वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू
ऋषींपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्याने
फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्त्यास परत दिल्या. त्या
त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या
नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या
झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या
विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने
लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.
शमीची पाने
या लेखातील/विभागातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा मजकुरात विज्ञानाच्या कसोट्यांवर न टिकणारा अवस्तुनिष्ठ अविश्वकोशीय
मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या
संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
|
शमीचे झाड
पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण
बृहन्नडेच्या रूपात असलेल्या
अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले.
आपट्याची पाने =
या वृक्षाला वनराज किंवा अश्मंतक असे
म्हणतात. पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहे. {१}
No comments:
Post a Comment