देवेंद्र फडणवीस
देवेंद्र गंगाधर फडणवीस जन्म: २२ जुलै इ.स. १९७० हे भारतीय जनता पक्षातील
नेते आणि महाराष्ट्राचे
१८वे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर
नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे
दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत.
त्यापूर्वी, वयाच्या ३८ व्या
वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले.
जीवन
‘माझ्या
बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला
बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा
प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल
मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात
देवेंद्र’ ही घोषणा आज
प्रत्यक्षात अवतरली.
फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर
शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रनं बीएस्सी अॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. त्यांनी
बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तथापि त्यांनी वडिलांप्रमाणे राजकारण अन् कायदा सोबत
चालतात म्हणून वकील होणे निश्चित केले.
देवेंद्र फडणवीस विधी महाविद्यालयात शिकून त्यात सुवर्ण पदक मिळवले. परंतु वकिली केली नाही
त्याला प्रचंड अभ्यास, अजोड
वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा
एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती.
त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अखिल
भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)चे
पॅनेल होते. ज्या विधी महाविद्यालयाच्या राजकारणात त्यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या
मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार
झाले. कमी वयात महापौर आणि आता मुख्यमंत्रीपदावर आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे
कष्टही महत्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर
वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर
महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या
कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर
महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला
मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला.
मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४
सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून
विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी
आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत
सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या
नावावर आहे.
शैक्षणिक पात्रता
- व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
- डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स ॲन्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
- एल्एल.बी (LLB)(नागपूर विद्यापीठ)
राजकीय टप्पे
- १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
- १९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
- १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
- १९९२ नागपूर शहर
- १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
- २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
- २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
- २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
विधिमंडळातील कार्य
- १९९९ पासून ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात आमदार
- अंदाज समितीचे सदस्य
- नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
- नियम समितीचे सदस्य
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
- राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
- सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
- स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समितीचे सदस्य
गुणविशेष
- आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असून विश्लेषण करण्याची पात्रता
- ’इंधन/ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल’ विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रण
सामाजिक योगदान
- ’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटॆट फॉर एशिया रीज”चे सचिव
- नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
- नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
- नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
- नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
- संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
आंतरराष्ट्रीय
- अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर
- अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
- ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य
- केनियातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
- चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण
- डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
- मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग
- युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग
- रशियात मॉस्को येथे भेट देणार्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
- स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन ॲन्ड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
- होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले पुरस्कार
- कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
- नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
- पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
- राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
- रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
- नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे 'नागभूषण' पुरस्कार
चरित्र
- लेखिका सुषमा नवलखे : सुषमा नवलखे यांनी फडणवीस यांचं चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment