Saturday, August 19, 2017

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री



देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस जन्म: २२ जुलै इ.स. १९७० हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. त्यापूर्वी, वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरूण मुख्यमंत्री ठरले.
 जीवन

 माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्यांचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली.
फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रनं बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. त्यांनी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तथापि त्यांनी वडिलांप्रमाणे राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून वकील होणे निश्चित केले.
देवेंद्र फडणवीस विधी महाविद्यालयात शिकून त्यात सुवर्ण पदक मिळवले. परंतु वकिली केली नाही त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)चे पॅनेल होते. ज्या विधी महाविद्यालयाच्या राजकारणात त्यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले. कमी वयात महापौर आणि आता मुख्यमंत्रीपदावर आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या मागे वडिल आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वत:चे कष्टही महत्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजीत देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
विधानसभेतही देवेंद्र यांची कामगिरी कायमच लक्षवेधी राहिली. त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि अभ्यासू आणि व्यासंगी लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावर आहे.

शैक्षणिक पात्रता

  • व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
  • डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्‌स ॲन्ड टेक्‍निक्‍स ऑफ प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
  • एल्‌एल.बी (LLB)(नागपूर विद्यापीठ)

राजकीय टप्पे

  • १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
  • १९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
  • १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
  • १९९२ नागपूर शहर
  • १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
  • २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
  • २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
  • २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष

विधिमंडळातील कार्य

  • १९९९ पासून ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात आमदार
  • अंदाज समितीचे सदस्य
  • नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
  • नियम समितीचे सदस्य
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
  • राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
  • सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
  • स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समितीचे सदस्य

गुणविशेष

  • आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असून विश्लेषण करण्याची पात्रता
  • इंधन/ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदलविषयांवरील आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रण

सामाजिक योगदान

  • ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटॆट फॉर एशिया रीजचे सचिव
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
  • संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य

आंतरराष्ट्रीय

  • अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये एनर्जी सिक्‍युरिटी इश्यूजया विषयावर शोधनिबंध सादर
  • अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
  • ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य
  • केनियातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्कया विषयी सादरीकरण
  • डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
  • मलेशियामध्ये जीपीएच एशिया रीजनल मीटमध्ये सहभाग
  • युरोपमध्ये क्रोएशिया येथे ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅटमध्ये सहभाग
  • रशियात मॉस्को येथे भेट देणार्‍या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी युनेस्कोडब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या डिझास्टर मिटिगेशन ॲन्ड मॅनेजमेंट इन इंडियाया विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
  • होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण

देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले पुरस्कार

  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
  • पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
  • नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे 'नागभूषण' पुरस्कार

चरित्र

  • लेखिका सुषमा नवलखे : सुषमा नवलखे यांनी फडणवीस यांचं चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.

बाह्य दुवे

 


मनोरंजनातून गणित


Thursday, August 10, 2017

स्वतचा समाजातील सहभाग

प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री राठोड संजयकुमार यांचा सत्कार करताना श्री गोब्बूर सर व सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे  इतर पदाधिकारी .


क्षेत्र भेट व वनभोज म्हणून श्री सिद्देश्ववर  मंदिरास भेट-  विद्यार्थ्यासोबत  श्री गोब्बूर सर.



सिंहगड इंस्टीट्युटचे२५ वे रौप्य वर्षा निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटताना श्री.गोब्बूर सर.
निवृत्तकनिष्ठ लिपिक सौ.देवकर  शशिकला म. - यांचा सत्कार करताना  श्री. गोब्बूर सर. इतर सहकारी शिक्षक 










थोर समाज सुधारक



(1) जोतीराव गोविंदराव फुले
टोपणनाव:
ज्योतीबा, ज्योतीराव, क्रांतिसूर्य, महात्मा, राष्ट्रपिता
जन्म:
मृत्यू:
संघटना:
प्रभाव:
प्रभावित:
वडील:
गोविंदराव फुले
आई:
चिमणाबाई फुले
पत्नी:
अपत्ये:
यशवंत
जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती; जनता त्यांना महात्मा फुले म्हणे.
बालपण आणि शिक्षण
जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

शैक्षणिक कार्य
महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महात्मा फुले हे थोर नेते होऊन गेले आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली.
सामाजिक कार्य
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहेअसे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकर्‍याचा असूडया पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहेहा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
सत्यशोधक समाज
२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.[१]तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.
लेखन साहित्य
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
रा.ना. चव्हाण यांनी सारसंग्राहकया पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसर्‍या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना महात्माही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली,






































































पश्चात प्रभाव (लीगसी)
महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी महात्मा फुलेनावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर असूडनावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
जोतिबा महात्मा फुलेनावाचा आणखी एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढत आहेत. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले असतील आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारतील.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या नावचे पुरस्कारही अगणित आहेत.


तृतीय रत्‍न
तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. "
या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये पुरोगामी सत्यशोधकमधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या व्यवहारोपयोगी नाटकया पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.
आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी नाटकया हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
नाटकाचे स्वरूप
या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.
नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. पथनाट्यम्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.
या नाटकातील विदूषकहे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.
हा विदूषकएकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.
फुलेंवर लिखित पुस्तके
  • महात्मा फुले (चरित्र) लेखक : शंकर कर्‍हाडे
  • महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
  • महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
  • महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
  • पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
  • महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
  • महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
  • महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे
  • महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर
  • महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
  • महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
  • महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विट्ठलराव भागवत
  • महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
  • महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
  • महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
  • महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन
  • महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
  • महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं. बा. सरदार
  • महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
  • महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
  • महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
  • महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. bagde
  • महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर
  • महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे
  • महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक : धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
  • महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी
  • महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)
  • महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
  • महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
  • महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
  • महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
  • महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
  • महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके
  • युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार
  • सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे.
  • महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.
  • मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कारदिला आहे.
  • असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे
  • क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)
  • महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव मोरे
सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.
 समारोप
विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.